1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 15 जून 2024 (13:05 IST)

शरद पवार गटाच्या खासदाराला भेटायला आला गँगस्टार, गोंधळ नंतर पार्टीने मागितली माफी

India
अहमदनगर मधून निवडले गेलेले एनसीपी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आणि गँगस्टर गजानन मारने यांच्या भेटी नंतर एकच गोंधळ निर्माण झाला आहे. सर्वीकडे चर्चा सुरु आहे. यानंतर शरद पवारांच्या पार्टीला सार्वजनिक रूपाने माफी मागावी लागली. एनसीपी आमदार रोहित पवार यांनी जबाब देत सांगितले की, लंके आणि माने यांची भेट पूर्वनियोजित न्हवती.योगायोगाने पुण्यामधील त्यांच्या परिसरात फेरफटका मारत असतांना भेट झाली. ते म्हणाले की, लंकेने मारनेला भेटणे बरोबर न्हवते. यामुळे मी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माफी मागतो. 
 
या प्रकरणात स्वतः लंके यांनी देखील माफी मागितली. तर रोहित पवार म्हणाले की, लंके ला या गोष्टीची माहिती न्हवती की, मारने कोण आहे. यापुढे पार्टी अश्या गोष्टींना घेऊन सावधान राहण्याकरिता नेत्यांची भेट घेत आहे. शुक्रवारी लंके अनेक पार्टी नेत्यांची भेट घेण्यासाठी आपल्या पुण्यामधील भवनात पोहचले. त्यांनी सांगितले की त्यांना मारने बद्दल काहीच माहित नव्हते. तसेच मारने ने लंके यांना शुभेच्छा देखील दिल्या. 
 
पोलीस रेकॉर्ड नुसार पुण्यामधील अपराधीक गॅंग मधील गजानन मारने एक आहे. तो दोन हत्याकांड प्रकरणात जेल मध्ये होता. पण त्याला जामिन मिळाला होता. जामीन मिळाळ्यानंतर त्याच्या समर्थकांनी रस्त्यावर शोभा यात्रा काढली होती. मारनेच्या लोकांनी नागरिकांमध्ये दहशद पसरविण्याचा प्रयत्न केला होता.