गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (17:16 IST)

येत्या ३१ जुलैपर्यंत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ३१ जुलैपर्यंत राज्यातील कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
 
तर राज्यात आज ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मुसळधार पावसाने अगोदरच धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी दरड दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले आहेत.
 
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांनी आपले घर गमावले. आत पुन्हा तीन-चार दिवसांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.