शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (07:56 IST)

याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे-सुषमा अंधारे

sushma andhare
गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राचा अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रकार ठरवून सुनियोजनाचा भाग आहे. हे षडयंत्र  देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवेंद्रजी सभागृहात साधा निंदा जनक प्रस्ताव देखील मांडत नाहीत. गुजरातच्या निवडणूक सुरू असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरात मध्ये स्थलांतरित करायचे. कर्नाटकाच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हटलं की महाराष्ट्रातले गाव कर्नाटकला जोडण्याचा प्रयत्न करायचा हे फार वाईट आहे. आजपर्यंत भाजपने जाती जातीत भांडत लावत होते. धर्मा धर्मात भांडण लावत होता. आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे. याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  केला आहे.
 
महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या आधी नेत्या अंधारे यांनी उपरोक्त आरोप केला आहे. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ वापरावा लागतो यातच आमचा विजय आहे असे अंधारे यांनी सांगितले.