रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (14:21 IST)

गाढ झोपेत असलेल्या या मुलीची झोप अखेरची ठरली

death
रत्नागिरी घोणसरे येथे साप चावून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही तरुणी मार्गताम्हाणे महाविद्यालयाची अकरावीची विद्यार्थ्यांनी आहे. सिद्धी रमेश चव्हाण असे या मृत तरुणीचे नाव आहे.
 
गुरुवारी दुपारी ३ वाजता ही विद्यार्थिनी घरी झोपलेली असताना ही घटना घडली. गाढ झोपेत असलेल्या या मुलीची झोप अखेरची ठरली. उंदराच्या मागावर हा साप घरात शिरला असल्याचा अंदाज आहे. सापाने तिला तीनवेळा दंश केला. या घटनेनंतर सिद्धीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शनिवार रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सिद्धीचा मृत्यू झाला.
 
सिद्धी चव्हाण हिचे कुटुंब मूळचे दुर्गवाडीतील असून, गेली १५ वर्षे ते घोणसरे येथे व्यवसायानिमित्त राहत आहेत. तिच्या पश्चात आई-वडील व छोटा भाऊ असा परिवार आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor