1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. The stage sleep of Shri Tuljabhavani Devi has begun

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा सुरू झाली आहे.

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा (घोर निद्रा) निद्रा सुरू झाली आहे. ३ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी अभिषेक पूजेनंतर देवी शेजगृहातील चांदीच्या पलंगावर मंचकी निद्रेसाठी विसावल्या. ही निद्रा भाद्रपद अमावास्या समाप्तीपर्यंत चालेल आणि ११ ऑक्टोबर २०२६ (आश्विन शुद्ध प्रतिपदा) पहाटे देवी पुन्हा मूळ सिंहासनावर आरूढ होऊन विराजमान होतील. त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील मुख्य विधी (घटस्थापना इ.) सुरू होतील.

परंपरेविषयीची माहिती
मातेची ही मंचकी निद्रा ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान असणार आहे. १० ऑक्टोबरला निद्राकाळ समाप्त झाल्यानंतर, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन देवीची मूर्ती पूर्ववत सिंहासनावर विराजमान केली जाईल. तुळजापूरची श्री तुळजाभवानी देवी ही जगात एकमेव 'चलमूर्ती' मानली जाते, जी वर्षातून तीन वेळा पलंगावर (मंचकावर) विश्रांती घेते.
पौराणिक कथेनुसार, या निद्राकाळात देवीची मूर्ती सिंहासनावरून हलवून चांदीच्या पलंगावर (मंचकावर) ठेवली जाते, त्यामुळे या काळात भाविकांना सिंहासनावरील मूळ रूपाचे थेट चरणकमळ दर्शन मिळत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेतात. शारदीय नवरात्रीपूर्वीची ही ८ दिवसांची घोर निद्रा आहे. पुराणकथेनुसार महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी देवी योगनिद्रेत होत्या; त्यामुळे याला घोर निद्रा म्हणतात. देवीची मूर्ती चलमूर्ती असल्याने ही परंपरा तुळजापूर मंदिरात विशेष आहे. निद्राकाळात दैनंदिन फोटो प्रसिद्ध होत नाहीत.
पुढील लेख
World Teachers Day 2026: जागतिक शिक्षक दिन, महत्त्व जाणून घ्या