शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (08:58 IST)

राज्यातला लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भातला आदेश ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाउन असणार आहे. 
 
दिवाळीनंतर करोनाचा संसर्ग वाढतो आहे असं लक्षात आलं. मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून कोरोना संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
 
केंद्राकडून नव्या मार्गदर्शक सूचना अर्थात गाईडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाउन करण्यासाठी राज्यांना केंद्राची संमती घेणं आवश्यक आहे. कोरोना कंन्टेन्मेंट झोन अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच संमती द्यावी असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.