संबंधित माहिती
- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची केली अधिकृत घोषणा
- सोमय्या यांनी माफी मागावी अन्यथा १०० कोटी द्यावे : अनिल परब
- रुपाली पाटील यांचे आगीतून फुफाट्यात पडलो असे होणार नाही : अजित पवार
- फडणवीस यांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार
- त्या पार्टीत कोण मंत्री होता का? आशिष शेलार यांचा सवाल
राज्यात कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याचा इशारा
दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. पुढील ४ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान २-३ डिग्री सेल्सियसने घसरणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यासह पुढील ४-५ दिवस भारतातील वायव्य आणि मध्य भारत तसेच गुजरातच्या बहुतेक भागांमध्ये देखील कडाक्याची थंडी पडणार आहे. या भागातील तापमानात २-४ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे.
पुढील काळात उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागातील तापमानात विशेष बदल होणार आहेत. त्यानंतर तापमाना त हळू हळू घट होणारआहे. महाराष्ट्रातील उत्तर – मध्य व संलग्न मराठवाडा तसेच विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार आहे.
पुढील लेख
