मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:26 IST)

त्या पार्टीत कोण मंत्री होता का? आशिष शेलार यांचा सवाल

Who was the minister in that party? Question by Ashish Shelar
भाजप नेते आशिष शेलार यांनीही या पार्टीवरुन महाविकास आघाडी सरकारवर गंभीर टीका केली आहे. या पार्टीत राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. त्या पार्टीत कोण मंत्री होता का? ते सीसीटीव्ही पाहून स्पष्ट करावं, मी मंत्र्याचं नाव घेत नाहीय, पण मी मागावर आहे, पालिकेने स्पष्टीकरण द्यावं असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
 
पार्टीला जाण्यावर आपला आक्षेप नाही, पण पार्टीत सहभागी झालेल्या नावांची पालिका अधिकाऱ्यांना लपवाछपवी केली आहे, असा आरोपही शेलार यांनी केला आहे. तसंच या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणीही शेलार यांनी केली आहे. या पार्टीत किती लोक सहभागी झाले होते, त्यांची कोरोना टेस्ट झाली का? असे सावर आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
 
आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. बाधित रुग्णाचा संपर्क असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही तपासणं हे मुंबई महापालिकेच्या कोविड नियमावलीत बसत नाही. बाधित रुग्णांचा वावर ज्या ठिकाणी झाला आहे त्या ३ इमारतींमध्ये कोविड टेस्टींग कॅम्प भरवून एकूण ११० जणांच्या कोविड टेस्ट करणअयात आल्या आहेत, या सर्व टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत.
 
करणी जोहरच्या इमारतीतील एकूण ५४ टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. करण जोहर आणि बाधित रुग्णानी दिलेल्या माहितीवरुन केलेल्या कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगनुसार ८ जण या पार्टीत होते. त्यांच्या निकट संपर्कातील सर्वांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. 
 
या पार्टीत कोणता मंत्री, राजकीय व्यक्ती होती का याबाबत अद्यापही कोणती माहिती बाधित व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांकडून देण्यात  आलेली नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.