रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:14 IST)

विहरीत आढळला विवाहितेचा मृतदेह; माहेरच्यांना हा संशय

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तालुक्यातील कुक्कडवेढे येथे  शेतातील विहिरीत एका विवाहित तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळला. मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला.
 
छाया शिवाजी भुसारे (वय २८, रा. कुक्कडवेढे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
 
स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. बऱ्याच महिन्यांपासून, माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरी शारीरिक व मानसिक छळ होत होता. सासरच्या त्रासाबाबत तिने माहेरच्या लोकांना सांगितले होते. शिवाजी आसाराम भुसारे (पती), आसाराम मारुती भुसारे (सासरे), यमुनाबाई आसाराम भुसारे (सासू), गीताबाई रमेश पंडित (नणंद) यांनी घातपात केल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी शिवाजी आसाराम भुसारे (पती), आसाराम मारुती भुसारे (सासरे), यमुनाबाई आसाराम भुसारे (सासू) या तिघांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.