1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:30 IST)

सोमय्या यांनी माफी मागावी अन्यथा १०० कोटी द्यावे : अनिल परब

Somaiya should apologize or pay Rs 100 crore: Anil Parab
सोमय्यांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही त्यांनी माफी मागावी अन्यथा १०० कोटी द्यावे” असे प्रतिपादन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. रत्नागिरी दौऱ्यादरम्यान  अनिल परब यांनी मुरुड साई रिसॉर्टवरून किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.
 
“मुरुड साई रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. मात्र किरीट सोमय्यांना माझ्य़ा शुभेच्छा आहेत. पण ज्या बाबतीत माझ्यावर बेछूट आरोप केले होते. याबाबतीत ज्या- ज्या यंत्रणा आहेत त्यांनी मी उत्तरे दिली आहेत. याबाबत राज्य शासनाने व पोलिसांनी पूर्ण चौकशी केली आहे. हे रिसॉर्ट कोणाच्या नावावर आहे, कोणाच्या मालकीचे आहे, त्याचे सर्व कागदोपत्री पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. रिसॉर्टसाठी कोणी खर्च केला त्याचे पुरावे, आयकर विवरणपत्रही पोलिसांना दिले आहे. हे रिसॉर्ट बेनामी आहे का किंवा यात अवैध पैसा गुंतवला गेला आहे का या सर्व आरोपांचे उत्तर मी संबंधित यंत्रणेला देईन. मी किरीट सोमय्यांना बांधिल नाही. ते मला प्रश्न विचारु शकत नाही. अधिकृत यंत्रणेकडे जाऊन मी उत्तरे दिली आहेत त्यांचे समाधान केले आहे.” असंही अनिल परब म्हणाले आहेत.
 
“या रिसॉर्टशी माझा संबंध नाही मात्र किरीट सोमय्या जाणून बुजून हे माझचं रिसॉर्ट असल्याचे सांगत बदनामी करत आहेत. यावर शासकीय यंत्रणा योग्य ती कारवाई करतील. मात्र जाणूनबूजुन माझा संबंध जोडायचा आणि महाविकास आघाडीचे बदनामी करायची माझी बदनामी करायची मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची हा किरीट सोमय्यांचा धंदा आहे. याबाबत अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात केला आहे. यावर डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयात सुनावणी होईल. किरीट सोमय्याला एकतर माझी माफी मागावी लागेल नाही तर मला १०० कोटी द्यावे लागतील.” असे अनिल परब यांनी सांगितले.