मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:28 IST)

फडणवीस यांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार

सर्वोच्च न्यायालयाने आज बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यावर  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘बैलगाडा शर्यत हा अतिशय पारंपारिक अशा प्रकारचा आमचा खेळ आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हा अतिशय आवडीचा असा खेळ आहे आणि यावर असलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगित केली. यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो.’
 
पुढे फडणवीस म्हणाले की, ‘२०१४ साली न्यायालयाने यावर बंदी टाकली, त्यानंतर आमचे सरकार आले. मी स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर तत्कालीन मंत्री प्रकार जावेडकर यांनी एक गॅझेट काढले आणि त्यामुळे या शर्यत पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा न्यायालयाने त्यावर बंदी घातल्यानंतर २०१७ साली त्या संदर्भातला आम्ही कायदा तयार केला. त्या कायद्याच्या माध्यमातून पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा बंदी घातली.’
 
‘मग महेश लांडगे यांच्या नेतृत्वात पुन्हा एका ‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ म्हणजेच बैल हा धावणार प्राणी आहे, यासंदर्भातील शास्त्रीय अहवाल तयार करावा अशाप्रकारचे निवेदन मिळाले. तत्कालीन मंत्री जानकर यांनी त्यासंदर्भातील निर्देश दिले. त्यानंतर आम्ही दोन महिन्यात ‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला आणि तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने ‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ हा अहवाल स्वीकृत करून त्याच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे. मला अतिशय आनंद आहे. ज्या ज्या लोकांनी यासाठी प्रयत्न केले आहे, त्यांचे मी आभार मानतो. महेश लांडगे यासारख्या इतर नेत्यांचे मी अभिनंदन करतो.’