फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या वडिलांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते आणि बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांशी झुंज देत होते. मेस्सीच्या यशस्वी कारकिर्दीत त्याचे वडील जॉर्ज यांची मोठी भूमिका होती.
फुटबॉल जगतातील महान खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेस्सीचे वडील, जॉर्ज मेस्सी, यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले आहे. ते एका दीर्घ आजाराशी झुंज देत होते. जॉर्ज मेस्सी यांनी शनिवारी रोझारियो शहरातील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मेस्सीच्या यशस्वी फुटबॉल कारकिर्दीत त्याच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी केवळ लहानपणापासूनच मेस्सीला पाठिंबा दिला नाही, तर दीर्घकाळ त्याचे एजंट म्हणूनही काम पाहिले. लिओनेल मेस्सीच्या बालपणीच्या क्लब, न्यूवेल्स ओल्ड बॉईजने, त्याचे वडील जॉर्ज मेस्सी यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.
लिओनेल मेस्सीचे वडील, जॉर्ज, यांनी आपल्या मुलाला एक यशस्वी फुटबॉलपटू बनवण्यात मोठी भूमिका बजावली. ते त्याच्या कारकिर्दीचे मुख्य शिल्पकार आणि सर्वात मोठे मार्गदर्शक होते.
Edited By- Dhanashri Naik
