मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2019 (10:14 IST)

एका युतीची दुसरी गोष्ट हे नाटकाचे नाव नाही वाचा संपूर्ण बातमी

या आगोदर मधल्या काळात शिवसेना, भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला होता मात्र आता तो कमी होत नाहीसा झाला आहे, आता 'युतीची दुसरी गोष्ट’ सुरु झाली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार आणि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या भाषणातून आगामी विधानसभेसाठी शिवसेना-भाजप एक सोबत लढेल, हे स्पष्ट केले. त्यामुळे  उद्धव पुढे म्हणाले की “ वेडात मराठे वीर दौडले सात, आपण आता सात नव्हे, ‘एक साथ’ लढायचंय आहे. शिवसेना-भाजपमधील मधल्या काळात दुरावा आता नाहीसा झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, ‘एका युतीची पुढची गोष्ट’ सुरु”  झाली आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शिवसेना-भाजप युती असेल असे स्पष्ट करत देत कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता शिवसेना - भाजपा युती होणार हे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे ते विधानसभा एकत्र लढवणार आहेत.