शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

का साजरा करतात फादर्स डे, जाणून घ्या

फादर्स डे सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी वॉशिंग्टनमध्ये साजरा केला गेला होता. यामागे रोमांचक कहाणी आहे- सोनेरा डोड यांची.
 
सोनेरा डोड लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला. वडील विलियम स्मार्ट यांनी सोनेरोला कधीच जीवनात आईची कमी जाणवू दिली नाही. वडिलांचा प्रेम आणि त्याग बघून एकेदिवस सोनेराला वाटेल की एक तरी दिवस केवळ वडिलांच्या नावावर असावा. या प्रकारे फादर्स डे साजरा होऊ लागला. 
 
1924 साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष केल्विन कोली यांनी फादर्स डे वर आपली सहमती दर्शवली. नंतर 1966 मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉनसन यांनी जून महिन्याच्या तिसर्‍या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची अधिकृतपणे घोषणा केली. 1972 मध्ये अमेरिकेत फादर्स डे च्या निमित्ताने स्थायी अवकाश घोषित झाला. आणि आता जगभरात जून महिन्याच्या तिसर्‍या महिन्याच्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.
 
भारतात देखील हा दिवस हळू-हळू सेलिब्रेट होऊ लागला आहे.