शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2023 (07:25 IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

supreme court
सर्वोच्च न्यायायलाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यामधील काही आमदार विद्यमान सरकारमध्ये मंत्रीपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे धक्का बसू शकतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, पाहा संपूर्ण यादी
१. एकनाथ शिंदे, (मतदारसंघ-कोपरी पाचपाखाडी, ठाणे)
२. अब्दुल सत्तार (मतदारसंघ-सिल्लोड, छत्रपतीसंभाजीनगर)
३. संदीपान भुमरे (मतदारसंघ-पैठण)
४. संजय शिरसाट (मतदारसंघ-छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
५. तानाजी सावंत (मतदारसंघ- भूम, परंडा)
६. यामिनी जाधव (मतदारसंघ-भायखळा, मुंबई)
७. चिमणराव पाटील (मतदारसंघ- पारोळा एरंडोल, जळगाव)
८. भरत गोगावले (मतदारसंघ-महाड, रायगड)
९. लता सोनवणे (मतदारसंघ-चोपडा, जळगाव)
१०. प्रकाश सुर्वे (मतदारसंघ-मागाठाणे, मुंबई)
११. बालाजी किणीकर (मतदारसंघ- अंबरनाथ, ठाणे)
१२. अनिल बाबर (मतदारसंघ-खानापूर, सांगली)
१३. महेश शिंदे (मतदारसंघ-कोरेगाव, सातारा)
१४. संजय रायमुलकर (मतदारसंघ-बुलढाणा)
१५. रमेश बोरणारे (मतदारसंघ-वैजापूर, छ. संभाजीनगर)
१६. बालाजी कल्याणकर (मतदारसंघ- नांदेड उत्तर)
Edited by : Ratnadeep Ranshoor