पाठ्यपुस्तकातच आता लेखनासाठी कोरी पाने
पुणे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून पाठयपुस्तकातच लेखनासाठी कोरी पाने असलेली पाठयपुस्तके दिली जाणार आहेत. या पुस्तकाचे तीन किंवा चार भाग असतील. सत्रानुसार विद्यार्थ्यांनी तो भाग घेऊन जायचा असल्याने दप्तराचे ओझेही वाढणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर काही पाठयपुस्तके तयार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.
शालेय शिक्षणमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागातील सर्व विभागांची आढावा बैठक बुधवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात घेतली. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरि÷ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.