बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (08:30 IST)

ठाकरे सरकारने दोन वर्षात राज्याला गुजरातच्या मागे नेले, फडणवीसांचा आरोप

uddhav devendra
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण तापलं असून विरोधकांकडून सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच, “महाविकास आघाडीने महाराष्ट्राला खाली आणले”, असा आरोपही केला.
 
” गुजरातच्या अर्थव्यवस्थेत जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा मोठा वाटा मोठा आहे. मात्र आपल्याकडे रिफायनरीलाच विरोध करण्यात आला. फॉक्सकॉनच्या अग्रवाल यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देतो असे त्यांना सांगितले, पण तोपर्यंत त्यांचा गुजरातसोबत करार झाला होता. आमचे सरकार येण्याआधी तो करार झाला होता. परंतु, यावरून आता काही जण बोलत आहेत, बोलणाऱ्यांनी आपले कर्तृत्व सांगावे, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्याला गुजरातच्या मागे नेले. पण आम्ही राज्याला पुन्हा एक नंबरवर आणू, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.