1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (07:59 IST)

विवाहितेवर अत्याचार करणारा तोतया पोलिस ख-या पोलिसांच्या कचाट्यात

The totaya police
शिर्डी येथील विवाहितेला पोलिस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवत लैंगीक अत्याचार करणा-या तोतया पोलिसाला राहता पोलिसांनी अटक केली आहे. किरण महादेव शिंदे असे तोतया पोलिसाचे नाव असून त्याच्या ताब्यातून पोलिसाचे नकली ओळखपत्र, पोलिसाच्या युनिफॉर्म मधील फोटो जप्त करण्यात आले आहे. अटकेतील तोतया पोलिस किरण शिंदे हा बीड येथिल हिवरफाडा येथील राहणारा आहे.
 
पिडीत विवाहीता आणि तोतया पोलिस किरण शिंदे यांच्यात एका अ‍ॅपच्या माध्यमातून सुरुवातीला ओळख व नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. किरण शिंदे याने तिला आपण पोलिस असल्याचे भासवून तिच्यासोबत जवळीक निर्माण केली. आपण शिर्डी पोलिस स्टेशनला नेमणूकीला असल्याचे त्याने तिला भासवले. तु तुझ्या नव-याला सोडून माझ्यासोबत रहा. मी तुला सर्व प्रकारचे सुख देईन अशा भुलथापा त्याने तिला दिल्या. त्याच्या भुलथापांना ती विवाहीता बळी पडली. नंतर किरण शिंदे हा खरा पोलिस नसून नकली पोलिस असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचार, फसवणूक व तोतयेगिरी या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात येवून त्याला अटक करण्यात आली आहे.