विशाळगडावरील बुरुज ढासळला; वाहतुक बंद
आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नदी- नाले तुडुंब वाहू लागले आहे. परिणामी अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नदी काठच्या नागरीकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज सकाळी विशाळगडावर जात असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज ढासळला आहे. त्यामुळे लोखंडी जिन्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी वाटेने नागरीकांनी गडावर प्रवेश करावा अशा सूचना शाहुवाडी पोलीसांनी दिल्या आहेत.
विशाळगडाला ऐतिहासिक महत्व आहे. हा प्राचिन किल्ला कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळ्याचा सिध्दी जोहरचा वेडा फोडून विशाळगडाचा आधार घेतला होता. गजापूर या गावापासून सुमारे चार किलो मीटरच्या अंतरावर पावनखिंड आहे. याच पावनखिंडीत नववीर बाजीप्रभू देशपांडे यांनी फक्त 300 मावळ्यांच्या साह्याने पराक्रम मिळविला होता.