सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 6 मार्च 2022 (12:25 IST)

दुमजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

मालेगावात टिळक रोडवर एका प्रचण्ड रहदारीच्या गजबजल्याच्या परिसरात दुमजली इमारत पत्त्यासारखी कोसळल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. इमारत कोसळल्याच्या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आल्यावर घटनास्थळी प्रशासन अधिकारी पोहोचले. अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मलबा हटविण्याचे कार्य सुरु केले आहे. 
ही इमारत जुनी असून धोकादायक होती. महापालिका प्रशासनाने नोटीस देऊन इमारत रिकामी करविली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ही इमारत कोसळण्याच्या काही सेकंदापूर्वी दोन महिला आणि काही जण या इमारती जवळून निघाले होते. पण नशीब बलवत्तर असल्याने ते वाचले. इमारत कोसळण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. इमारत कोसळल्याने परिसरात नागरिकांची धांदल उडाली. लोक आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.