शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (17:24 IST)

व्हिडीओ काढण्याच्या नादात कॉलेज तरुणीचा दुर्देवी अंत

सध्या लोकांना व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नाद लागला आहे. या व्हिडिओ पाई कित्येक लोकांना आपल्या जीव गमवावा लागतो तरी ही सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचा छंद लागला आहे. काही लोकांना भटकंती करण्याची सवय असते ते त्या स्थळाचे चित्रीकरण करून आपल्या मोबाईलमध्ये त्याची आठवण साठवून ठेवतात. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरण परिसरात फिरायला गेलेल्या एका तरुणीला व्हिडीओ करणे महागात पडले आणि तिला आपला जीव गमवावा लागला. 

अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरण परिसरात काही तरुणी फिरायला गेले असता एका तरुणीने धरणाच्या भिंतीवर चढून व्हिडीओ शूट करत असताना तिचा पाय घसरून ती धरणाच्या भिंतीवरून 50 फूट दगडी बांधकामावर पडून तिचा मृत्यू झाला. उज्ज्वला बाळू  वैराळ (17) रा. अकोले तालुका वाकी असे या मयत तरुणीचे नाव आहे. तिने धरणाचा भिंतीवर चढून शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉलेजच्या  काही मैत्रिणी कॉलेजच्या जवळ असलेल्या भंडारदरा धरणं परिसरात फिरायला गेले असता सर्व मुली घरणाच्या भिंतीवर चढून व्हिडीओ चित्रित करण्यात गुंग झाल्या. मयत तरुणीने देखील धरणाच्या भिंतीवर चढून व्हिडीओ काढले. दरम्यान तिचा तोल जाऊन ती खाली पडली आणि मरण पावली. तिच्या सोबत असलेल्या मुली परत कॉलेजात आल्या. त्यांना वाटले की उज्ज्वला कॉलेजात परत आली. म्हणून तिच्या विषयी असे काही घडले आहे याची कोणालाच कल्पना आली नाही. तिचा कॉलेजचा बॅग आणि ओळखपत्र पडलेले एका महिलेला त्या धरणाच्या भिंतीवरून पडलेले दिसले तिने खाली डोकावून बघता तिला तरुणीचे मृतदेह दिसले. तिने तातडीने जाऊन धरणाच्या सुरक्षा रक्षकाला बोलावले नंतर पोलिसांना या बद्दल माहिती दिली. या घटने मुळे उज्ज्वालांच्या मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे.