25 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना 25 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली आहे. तसेच 45 वर्षे वयावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी या पत्रात मोदी यांचे आभार देखील मानले आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. जास्तीतजास्त कोरोनाच्या चाचण्या करवून आपण माला आळा घालण्याच्या प्रयत्नात आहोत. कोरोना लसीकरणाची मोहीम महाराष्ट्राने अत्यंत गांर्भीयाने घेतली असून लसीकरणात महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. मोठ्या प्रमाणावर तरुण आणि काम करणार्या वर्गाला लस दिली तर, कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.