माझी पूजा अपूर्ण आहे !

devghar
Last Modified सोमवार, 5 एप्रिल 2021 (16:24 IST)
पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !
पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो !
पण त्या पांढर्‍या
रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो !
पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज मी देवाजवळ दिवा लावतो !
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो !
पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !
पण त्या कापराच्या
वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !
पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवासमोर स्थिर बसून
तासभर ध्यान करतो !
पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो !
पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो !
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
-सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, लखीमपूर ...

देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, लखीमपूर जिल्ह्यात अतिरिक्त फौज तैनात
नवी दिल्ली. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी आज लखीमपूर घटनेचा निषेध करून रेल रोको ...

वाद केल्यामुळे रागाच्या भरात, पतीने पत्नीची हत्या करून ...

वाद केल्यामुळे रागाच्या भरात, पतीने पत्नीची हत्या करून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली
वाद कोणाचे होत नाही पती पत्नी मध्ये वाद होणं देखील साहजिक आहे. पण वाद विकोपाला जाऊ नये ...

चांगली बातमी ! राज्यातील नागरिकांना दिवाळीची भेट ...

चांगली बातमी ! राज्यातील नागरिकांना दिवाळीची भेट मिळणार,लसीचा एक डोस घेणाऱ्यांना सर्वत्र प्रवास करण्याची परवानगी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली
सध्या राज्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने कमी होत आहे. सध्या, दररोज कोरोना बाधित रुग्णांची ...

क्रिकेटर युवराज सिंगला अटक आणि जामीन

क्रिकेटर युवराज सिंगला अटक आणि जामीन
क्रिकेटर युवराज सिंग याला रविवारी (17 ऑक्टोबर) हरियाणा पोलिसांनी जातीय वक्तव्य ...

महाराष्ट्र अनलॉकः राज्यातील जनतेला दिवाळीनंतर मिळणार मोठी ...

महाराष्ट्र अनलॉकः राज्यातील जनतेला दिवाळीनंतर मिळणार मोठी गुडन्यूज
ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील जनतेला दिवाळीनंतर मोठी गुडन्यूज मिळणार आहे. तसे सुतोवाच ...