भिवंडीत इंडियन कार्पोरेशन कॉम्प्लेक्स इमारतीच्या गोदामाला आग लागली  
					
										
                                       
                  
                  				  आज सकाळी भिवंडी ग्रामीण दापोडी, मानकोनी नाक्याजवळ इंडियन कार्पोरेशन कॉम्प्लेक्समधील इमारत क्रमांक 189 च्या तळमजल्यावरील गोदामला आग लागली. या गोदामात लाकडी वस्तूंवर शायनींग आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा मोठा साठा होता. ही आग आज सकाळी 7:30 वाजता लागली. धुराचे लोळ उंच पसरत असल्यानं परिसरात खळबळ उडाली. या आगीत संकुलातील 3 गोदाम अंगीच्या भक्ष्यस्थानी आहे. 
				  													
						
																							
									  
	
	माहितीनुसार, दापोडा येथे हे इंडियन कॉर्पोरेशनचे संकुल आहे. आज सकाळच्या सुमारास या संकुलातील 3 गोदामात अचानक आग लागली. गोदामात थिनर, पेंट याचा साठा असल्याने आग आणखीच भडकली असल्याची माहिती आहे.
				  				  
	
	आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळतातच भिवंडी अग्निशमन दलाचे बंब  घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.