लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाने मुलीच्या वडिलांची हत्या केली
एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी नकार दिल्यावर तरुणाने कट रचवून ईदच्या दिवशी मुलीच्या घरी जाऊन वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे एका मुस्लिम मुलीवर प्रेम होते.त्याने मुलीच्या वडिलांकडे जाऊन लग्नाची मागणी घातली. मात्र मुलीच्या वडिलांचा आंतरधर्मीय लग्नाला विरोध होता. त्यांनी नकार दिला.
या वर आरोपी तरुणाने मुलीच्या वडिलांना ठार मारण्याचा कट रचला आणि आपल्या सोबत इतर दोघांना घेऊन ईदच्या दिवशी मुलीकडे गेला आणि धारदार शस्त्राब आणि काठ्याने मुलीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला त्याने मुलीवर पण हल्ला केला आणि सर्वांना बेदम मारून तिथून पळ काढला
या प्राणघातक हल्ल्यात मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे
पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे.
Edited by - Priya Dixit