बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जून 2024 (15:57 IST)

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

rape
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात ऑटो रिक्षातून प्रवास करत असताना एका 39 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. महिलेने रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार केली असता रिक्षा चालकाला अटक केली आहे.  अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. 
 
सदर घटना  13 जून रोजीची आहे. या पीडित महिलेने कल्याण रेल्वे स्थानकातून रिक्षा तिच्या घरी वालधुनी जाण्यासाठी घेतली. महिलेने घर आल्यावर रिक्षा चालकाला भाडे दिले असता त्याने तिचा हात धरला आणि शिवीगाळ केली. तसेच तिला धमकावले. 

महिला घडलेल्या प्रकारामुळे घाबरली नंतर तिने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार नोंदवली. शुक्रवारी संबंधित तरतुदींनुसार ऑटो-रिक्षाचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.आणि पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit