गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2024 (17:25 IST)

पोलीस अधिकारी बनून व्यावसायिकाची 20 लाख रुपयांची फसवणूक

20 lakh rupees fraud of a businessman
सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे प्रकार सुरूच आहे. ठाण्यात देखील युपी पोलीस अधिकारी बनून एका व्यावसायिकाची 20 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.  

सदर घटना ठाण्यात घडली असून फसवणूक करणाऱ्याने एका व्यावसायिकाची युपी पोलीस अधिकारी बनून मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी केली.या 66 वर्षीय दुकान मालकाला वाचवण्याचा बहाण्याने 20 लाख रुपयांची मागणी केली.

आरोपीने त्याला वेग वेगळ्यावेळी फोन केला आणि स्वतः उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आलमबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी असल्याचा दावा केला.आरोपीने पीडितेला सांगितले की, लखनौ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अटक टाळण्यासाठी त्याला 19,02,999 रुपयांची मागणी केली.आरोपीने त्याला वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करायला सांगितले. 
 
व्यावसायिकाने आरोपीला पैसे दिल्यानंतर त्याने युपी पोलीस ठाण्यात फोन केल्यावर त्याच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाली हे त्याला कळाले.

पीडित व्यावसायिकाने बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. शनिवारी तक्रारी नंतर बदलापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरुद्धच्या एफआयआर नोंदवली आहे.  
 
Edited by - Priya Dixit