शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (18:27 IST)

राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचा जोर वाढणार,अतिवृष्टीचा इशारा

केरळ मध्ये मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रात देखील मान्सून दाखल झाला असून राज्यात पुढील पाच दिवस पाऊस कोसळणार असून रविवार ते मंगळवार मुंबईला अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 7 ठिकाणी वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून अरबी समुद्रात व गोव्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असून किनारपट्टी आणि पश्चिम घाटातील परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  

रविवार पासून येत्या 3 दिवस मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 
पुणे आणि परिसरात पावसाने हजेरी लावली असून हवामान थंड झालं आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.अद्याप पुण्यात मान्सून आला नसल्याचे हवामान खात्यानं जाहीर केले नाही.

येत्या पुढील पाच दिवस महाराष्ट्र किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नैऋत्य मान्सून आज दक्षिण महाराष्ट्र दक्षिण छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागात पोहोचला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 
 
Edited by - Priya Dixit