रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2024 (10:00 IST)

राज्याच्या काही भागात अवकाळी पाउस,.आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान

राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. काही भागात अवकाळी पाऊस  झालाय. तर काही भागात गारपीटचा तडाखा बसला आहे.  विशेषत: विदर्भाच्या काही भागात अवकाळी झालाय. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा  जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय.आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. 
 
अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार वादळी पाऊस झाला. गारपीट आणि पावसामुळं आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झालीय. खामगाव तालुक्यातील रोहणा, गानेशापुर परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय.
 
परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आज विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या 4 तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. यामुळे परभणीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
 
लातूर शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे.  मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली होती. प्रचंड उकाडा जाणवत होता. काही वेळापासून ढगाळ वातावरण तयार झाला आहे. पावसाच्या हलक्या सरीमुळं वातावरणात गारवा निर्माण झालाय. मागील काही दिवसापासून उकाड्यांना हैराण असलेल्या लातूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor