रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2024 (09:55 IST)

राज्यात या भागात आज कोसळणार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

monsoon
सध्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून पाऊस कधी येणार ही वाट पाहत आहे. मान्सून केरळ मध्ये दाखल झाला असून महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने अशी शक्यता वर्तवली आहे. 
अनेक भागात तापमान घसरला असून सध्या ढगाळ वातावरण झाले आहे.

भारतीय हवामान खात्या कडून आज शुक्रवार आणि शनिवारी मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मनघालाय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या भागात पावसाने हजेरी लावली. या सह लक्षद्वीप, दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. 
येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

महाराष्ट्रातील मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भाचाकाही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.महाराष्ट्रात यंदा 5 ते 6 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यंदा 30 मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला आहे.या मुळे राज्यातील वातावरण बदलले असून सध्या ढगाळ वातावरण आहे. तापमानात घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. 
 
Edited by - Priya Dixit