शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (11:34 IST)

दारूसाठी तरुणांनी जीव धोक्यात टाकून पाण्यात उड्या टाकल्या

ज्याला दारूचे व्यसन असेल तो त्यासाठी काहीही करण्यास तत्पर असतो . असेच काहीसे घडले आहे तुळजापूर येथे.  काही लोकांनी दारूसाठी आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात चक्क उड्या टाकल्या. झाले असे की  तुळजापूर -लातूर महामार्गावर कर्नाटकातील हुमनाबाद येथून विदेशी दारूचे  बॉक्स घेऊन एक ट्रक कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला असता सोमवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर मार्गावर पाचुंदा तलावा जवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले प्रसंगावधान राखता चालक आणि क्लिनर दोघांनी ट्रक मधून बाहेर उडी टाकली. ट्रक अनियंत्रित होऊन पाचुंदा तलावात पडला. या अपघाताची माहिती आणि पाण्यात दारूचा ट्रक पडल्याची माहिती मिळतातच काही तरुण तिथे जमले आणि त्यांनी दारूचे बॉक्स पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकत चक्क तलावात उडी टाकली आणि दारूचे बॉक्स बाहेर काढले आणि आपल्या पिशव्यात भरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या अपघाताची नोंद केली जात आहे.