शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (08:37 IST)

अबब, आंबेजोगाईत दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी

sweets
बीडच्या आंबेजोगाई दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी करण्यात आलीय. विशेष म्हणजे गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच ही चोरी केलीय. आंबेजोगाईतील व्यापारी प्रदीप वाघमारे यांच्या गोडाऊनमध्ये काम करणारे कामगार अडीच ते तीन वर्षांपासून चॉकलेट चोरी करत होते. 
 
व्यापाऱ्यात तोटा होत असल्यानं वाघमारेंनी गोदामात सीसीटीव्ही लावलं आणि त्यानंतर गोडाऊनमधले कामगारच चॉकलेट चोरी करत असल्याचं लक्षात आलं. राहुल पवार आणि गणेश मुनीम अशी या चॉकलेटचोरांची नावं आहेत. हर दोघे  सातत्यानं हे चोर चॉकलेटची चोरी करत होते.