गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By
Last Updated : मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (15:57 IST)

Chocolate Modak हे मोदक मुलांनाही आवडतील, बाप्पाला चॉकलेट मोदकाचा नैवेद्य दाखवा

Ganesh Chaturthi 2024
साहित्य - 1 पॅकेट ग्लुकोज बिस्किटे, 100 ग्रॅम ड्रिंकिंग चॉकलेट पावडर, 1/4 टीन कंडेन्स्ड मिल्क, 50 ग्रॅम नारळ पावडर, काजू, बदाम, मनुका (पर्यायी), तूप.
 
चॉकलेट मोदक कसे तयार करावे - 
ग्लुकोज बिस्किटांची पावडर बनवा. ड्रिंकिंग चॉकलेट पावडरमध्ये मिसळा, त्यात मिल्क मेड आणि 4 चमचे तूप घाला. 
काजू आणि नट्स जराश्या तुपात परतून घ्या. 
चॉकलेट मिक्सचा एक गोळा बनवा आणि ते करत असताना त्यात ड्राय फ्रूट्स ठेवा. आता याला मोदकाचा आकार द्या. तुम्ही मोल्ड्स देखील वापरू शकता. 
विशेष टीप: नारळबुरा घेऊन त्यावर मोदक रोल करा आणि गार करुन सर्व्ह करा. हे मोदक मुलांनाही आवडतील