शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (21:34 IST)

मग यंदाचा बजेटमध्ये खर्च वाढला कसा, आदित्य ठाकरेंचा सवाल

Aditya Thackeray
मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा तब्बल ५२ हजार कोटींचा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ६६७० कोटी जास्त आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा देशातील तब्बल आठ राज्यांपेक्षा मोठा आहे.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या वाढीव अर्थसंकल्पावर माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईच्या वाढलेल्या या बजेटवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुस्तकात कुठलाच नवीन मोठा प्रकल्प नाही मग यंदाचा बजेटमध्ये खर्च वाढला कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
 
मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प २०२३ आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला. यंदा मुंबई महापालिकेने विक्रमी ५२ हजार कोटीचं बजेट सादर केलं. मुंबई मनपाच्या बजेटने पहिल्यांदाच ५० हजार कोटींचा आकडा पार केला. ‘हा मुंबईकरांसाठीचं बजेट नाही तर कॉन्ट्रॅक्टरसाठीचं वर्षा बंगल्यावरून छापून आलेलं बजेट आहे, असा आरोपही यावेळी आदित्य ठाकरेंनी केलाय.
 
लोकशाहीमध्ये एका ऑफीसरने स्वतःला लोकप्रतिनिधी समजू नये, प्रशासक म्हणून काम करत असताना महापौर किंवा नगरसेवक समजू नये. महापालिकेत सर्व अधिकार लोकप्रतिनिधींचा असतो. तरीही महापालिकेचं बजेट प्रशासकाकडून सादर झाला.”, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. यापुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “रस्त्यांचं बजेट २ ते २.५ कोटी पर्यंत असायचं ते आता साडे सहा हजार कोटीपर्यंत नेलं. टेंडर्स पाहिल्यानंतर पाच कॉन्ट्रॅक्टरना प्रत्येकाला एक ४८ टक्के देयक देण्यात आली आहे. त्यामुळे बीएमएसी नक्की कुणाला फसवतेय? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
Edited by : Ratnadeep Ranshoor