रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (15:59 IST)

BMC Budget मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर; निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा

मुंबई महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवार ४ फेब्रुवारीला पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपये इतके होते. २०२३-२४ आकारमान ५२ हजार ६१९ कोटी ७ लाख रुपयांवर पोहोचले आहे. नवीन करवाढीची कोणतीही घोषणा नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
 
मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १४.५२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प आज (४ फेब्रुवारी २०२३) सादर करण्यात आला आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईच्या यंदाच्या अर्थसंकल्पाने ५२ हजार ६१९ कोटींचा आकडा गाठला आहे. गेल्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १४.५२ टक्क्यांनी म्हणजेच ६ हजार ६७० कोटी रुपयांची वाढ झाल्याची पाहायला मिळाले. मुंबई महानगरपालिकेचे गेल्या वर्षी ४५ हजार ९४९ कोटींचे अर्थसंकल्प सादर करण्यात आले होते.
 
मुंबई महानगरपालिका आरोग्य अर्थसंकल्प वैशिष्ट्ये-
२०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये १२८७.४१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८०.१९ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे.
नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याबरोबरच, के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एम. आर. आय. मशिन उभारण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १.४० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ३५ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
असंसर्गजन्य रोग कक्षासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सदर उपक्रमासाठी १२ कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
शिव योग केंद्रांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसूली खर्चाकरिता ५ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor