सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (22:57 IST)

“..तर याची किंमत राज्यातल्या गावांना मोजावी लागेल”

ajit pawar
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. “आज १८ ऑगस्टला धरणं पूर्ण भरली आहेत. मोठा पाऊस आला, तर पाणी वाहून जाण्यासाठी धरणातलं पाणी, पाणलोट क्षेत्रातलं पाणी एकत्र होईल, तेव्हा नदीकाठच्या सर्व गावांना, शहरांना धोका निर्माण होईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी धरणावर अधिकारी असलेच पाहिजेत. पाऊस सुरू झाला आणि धरणावर दरवाजे कमी-अधिक उघडण्यात खालच्या अधिकाऱ्यांनी काही चूक केली, तर त्याची किंमत महाराष्ट्रातल्या खालच्या भागातल्या गावांना मोजावी लागेल”, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
 
हे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून माध्यमांसमोर भूमिका मांडणाऱ्या काही प्रमुख नेतेमंडळींमध्ये अब्दुल सत्तार यांचा समावेश होता. शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यावरून वाद देखील झाला. टीईटी घोटाळ्याच्या संदर्भात त्यांचं नाव घेतलं जात असल्यामुळे त्यावरून टीका झाली होती. पहिल्या खातेवाटपामध्ये कृषीमंत्रीपद अब्दुल सत्तार यांना दिल्यानंतर त्यावरून देखील जोरदार चर्चा रंगली होती. आता विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.