मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2023 (07:43 IST)

राज्यात सहा ठिकाणी नव्याने आगी

fire
पणजी :गोव्यातील आगीच्या वणव्याची पुन्हा एकदा पंतप्रधान कार्यालयाने माहिती मागितली. राज्यात नव्याने कोळंब कुर्डी, किनाळकट्टा काणकोण, आवळी – काणकोण, पाटे नेत्रावळी, सोनशी – सत्तरी या सरकारी वनक्षेत्रात आगी लागल्या. आग भगवान महावीर अभयारण्यातही पोहोचली. वनमंत्री विश्वजित राणे यांनी 14 ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात शनिवारी यश मिळविल्याची माहिती दिली. मात्र त्याचबरोबर अद्याप 9 ठिकाणी आगीचा भडका चालूच आहे. राज्यातील वनस्पती सुरक्षित असल्याचा दावाही मंत्री राणे यांनी केला. नौदलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी शनिवारी पाण्याची फवारणी केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गोव्याला आवश्यक ती सर्व मदत द्या, असे पश्चिम क्षेत्रीय नौदल विभागाला कळविले आहे. गरज पडल्यास आज रविवारी जादा हेलिकॉप्टर्स पाठविली जातील.
 
गोव्यात आगीचा वणवा अद्याप चालूच आहे. 14 ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात यश आल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिकांची तसेच कार्यकर्त्यांचीही मदत घेतली जात आहे. आपण सातत्याने अतिरिक्त प्रधान वनपाल यांच्या संपर्कात आहे व आपल्याला संपूर्ण अहवाल मिळत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आवश्यक ते सर्व सहकार्याचे आश्वासन दिले व त्याची शिताफीने अंमलबजावणी सुऊ देखील केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor