ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळाले!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहे. एका कौटुंबिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वेगवेगळ्या बाजूंनी उभी असलेली माणसे एकत्र दिसली तेव्हा राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली. ठाकरे घराण्यातील दोन्ही नेते एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवे रूप पाहायला मिळेल, असेही बोलले जात होते.
वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे रविवारी झालेल्या मनसेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाच्या समारंभात राज ठाकरेंसह अनेक दिग्गजांची उपस्थिती लावली.या वरून चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांचे स्वागत खुद्द रश्मी ठाकरें यांनी केले. कौटुंबिक समारंभात राज ठाकरे यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आता येत्या काही दिवसांत ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे तेथे जेवणासाठी गेले असल्याने त्यांना थेट राज ठाकरेंना भेटता आले नाही. असे असतानाही चर्चा सुरु आहे.
Edited By - Priya Dixit