कोणाला किती खाती मिळणार वगैरे ही वाटाघाटी झाली , मात्र अंतिम निर्णय नाही- अब्दुल सत्तार
Photo-Facebookशिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट मंत्रीमंडळ विस्तार आणि मंत्र्यांच्या शपथविधीसंदर्भातील तारखेबद्दल भाष्य केलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये ठाण मांडून असणाऱ्या सत्तार यांनी ३ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं म्हटलंय.
सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये खातेवाटप आणि मंत्रीपदांसंदर्भातील वाटपाबद्दल अंतिम बोलणी पूर्ण झाल्याचा दावा सत्तार यांनी केलाय. “कोणाला किती खाती मिळणार वगैरे ही वाटाघाटी झालेली आहे. मात्र अंतिम निर्णय झालेला नाही,” असं सत्तार यांनी म्हटलं आहे. “मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून अंतिम यादीही तयार आहे. दिल्लीमधील वरिष्ठ नेते ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत त्यांनी विचारविनिमय केलेला आहे. त्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होईल,” असं सत्तार म्हणालेत.