शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (21:24 IST)

केदार दिघे यांच्यासंदर्भात न्यायालयात झाला हा मोठा खुलासा

kedar dighe
आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी धमकावल्यासह बलात्काराची तक्रार एका महिलेने केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचसंदर्भात दिघे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच दिघे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरही कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली असताना कोर्टाने म्हटलंय की, केदार दिघे यांच्यावर बलात्काराचा आरोप नाही, केवळ धमकीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना अशा स्थितीत कोणत्याही कोठडीची आवश्यकता नाही. ते तपासाला सहकार्य करणार असल्याबाबत आश्वस्त करत असल्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ शकतो, असे कोर्टाने म्हटले आहे.
 
शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यावर बलात्कार आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केदार दिघे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी अखेर त्यांचा अर्ज मान्य करण्यात आला आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. केदार दिघे यांच्यावरती एका तरुणीनं धमकी दिल्याचा आरोप केला होता. दिघे यांच्या मित्रावर 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण सहा जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्यात केदार दिघे यांचाही समावेश असून केदार दिघे यांना अटक करण्यात येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती.
 
अखेर आता केदार दिघे यांना दिलासा मिळाला असून त्याच्यावरील अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. तपासात सहाकार्य करण्याच्या अटीवर त्यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केला आहे. केदार दिघे यांनी दि. १ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आली होती. याच दिवशी केदार दिघे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीला गेले होते. त्यानंतर त्यांनी शिवाजी मार्कवरही जात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट दिली होती. दरम्यान, त्यांना एक फोन कॉल आला होता. हा फोन कॉल कामदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा होता. या व्यक्तीने सहआरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये वाद झाला असल्याची माहिती दिली.
 
पीडितेसोबत गैरवर्तन झाल्याचं कळलं, अशी माहितीही केदार दिघे यांनी कोर्टात दिली. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडितेने सहआरोपींकडे पैशांची मागणी केल्याचा आरोपही केदार दिघे यांनी केला होता. पीडितेचं म्हणणं खोटं असून तिने केलेल्या आरोपात तत्थ नसल्याचाही दावा दिघे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करताना केला होता. तर दुसरीकडे पोलिसांच्या वतीने हा जामीनअर्ज मान्य केला जाऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला. तपास आता महत्त्वाच्या टप्प्यामध्ये असून हा जामीन अर्ज मंजूर करु नये, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र दिघे हे तपासाला सहकार्य करतील, अशा अटीवर त्यांचा जामीन अर्ज मान्य करण्यात आला आहे.