कीर्तन सोहळ्यात पोलिसाची दादागिरी, मारहाण करण्याच्या धमक्या
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात कीर्तन समारंभात एका पोलिसाने दादागिरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कीर्तनकारांसह वारकऱ्यांनाही मारहाण करण्याची धमकी दिली.
वारकरी संप्रदायात कीर्तनकार ज्या ठिकाणी उभे राहून ध्यान करतात त्या जागेला नारदाचे सिंहासन म्हटले जाते आणि पोलीस निरीक्षका पायत जोडे घालून त्या जागेवर उभे असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे चाळीसगाव शहरात हनुमानसिंग नगरात सप्तशृंगी मातेच्या जयंतीनिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सातव्या दिवशी सोमनाथ महाराजांची कीर्तन सेवा सुरू असतानाच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील तेथे पोहोचले आणि त्यांनी ध्वनिक्षेपकाच्या मुद्द्यावरून वारकऱ्यांशी वाद घालत नियमांचे कारण सांगितले. त्यांनी वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.
या घटनेला वारकरी संप्रदायाने कडाडून विरोध केला असून पोलिस निरीक्षक पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.