गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (08:25 IST)

“हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”

राज्यात सुपर मार्केटमध्ये शोकेसमध्ये वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय नवाब मलिक यांनी जाहीर केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना हे पूर्णपणे बेवड्यांना समर्पित सरकार असल्याची टीका केली आहे. राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या एका निर्णयाची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्यानंतर त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
 
या निर्णयावरून सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मस्त पियो, खूब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे.
करोनामध्ये सर्वसामान्यांना औषधाची आवश्यकता आहे. पण दवा नहीं, हम दारू देंगे, महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे हा या सरकारचा निर्णय आहे. करोनामध्ये कष्टकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. राजकारण करणे आणि दारूवाल्यांना प्रोत्साहन देणे ही यांची भूमिका आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.