रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (22:13 IST)

काय म्हणता, राज्यात मास्कपासून सुटका होण्याची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे. गुरुवारी  झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मास्कसंदर्भात चर्चा करण्यात आली. मास्कसंदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा केली जाणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर केलं जाणार आहे. 
 
दुसरीकडे राज्यात लसीकरण मोहिमेवर विशेष भर दिला जात आहे. आतापर्यंत १४ कोटी ६९ लाख ५७ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. यात ६ कोटी ३ लाख १२ हजार नागरिकांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे. तर ८ कोटी ५९ लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे. राज्यात संपूर्ण लसीकरणानंतर मास्कपासून सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.