1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मे 2023 (08:10 IST)

त्र्यंबकेश्वर प्रकरणी हिंदू महासभेची हि आहे मागणी…

Trimbakeshwar
Trimbakeshwar News हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे मानले जाणारे नाशिकचे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे आज हिंदू महासभे तर्फे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले आहे.
 
१३ मे रोजी रात्रीच्या सुमारास मुस्लिम बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे मंदिरात धूप अदा करत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी सुरक्षारक्षक आणि त्याचबरोबर मुस्लिम बांधवांमध्ये काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पुन्हा असे प्रकार त्र्यंबकेश्वर परिसरात घडू नये, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत त्र्यंबकेश्वर मंदिरात शुद्धीकरण करत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर उत्तर दरवाजाचा असलेला फलकही काढून घेतला.
 
हिंदुस्थानाचे राष्ट्रगीत नाकारणार्यानी मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबकेश्वर हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. सर्वजण येथे दर्शनासाठी येतात, येथे इतर धर्मियांप्रमाणे चादर चढवणे असा कोणताही प्रकार होत नाही. त्यामुळे मंदिराचे शुद्धीकरण करत असल्याचे हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले. यादरम्यान, नाशिक तसेच महाराष्ट्रातून कार्यकर्ते पाठींबा देण्यासाठी उपस्थित झाले आहेत.
 
याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनीही मुस्लिम बांधवांकडून दरवर्षी धूप अदा करण्यासाठी उत्तर दरवाजाच्या पायरीपर्यंत येऊन मुस्लिम बांधव धूप अदा करत असतात. अशी माहिती दिली होती, यावर मंदिर व्यवस्थापनाने त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि एसआयटी स्थापन केली. संपूर्ण प्रकाराची चौकशी करत, चार उरूस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणा दरम्यान शहरात शांतात आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या कार्यालयात शांतता समितीची बैठक सुरु आहे. सर्व पक्षीय अधिकारी आणि त्याचबरोबर दोनही धर्मियांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor