मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (20:06 IST)

मगरीला मारली मिठी

ajgar
एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका मोठ्या मगरीला ज्या प्रकारे मिठी मारताना दिसत आहे, ते पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटेल.
 
अशा जंगली आणि क्रूर प्राण्यांना पाहिल्यानंतर इतर कोणत्याही प्राण्यांची भीतीने गाळण उडते. तिथे हा माणूस आरामात न घाबरता मगरीला मिठी मारताना दिसतो. त्या व्यक्तीकडे पाहून असे म्हणता येईल, की तो या मगरीला अजिबात घाबरत नाही. मगर आणि व्यक्तीचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर jayprehistoricpets नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की जेव्हा डार्थ गेटरला बिग बॉय व्हायचे आहे आणि त्याला खेळायचे आहे.
 
तुम्हाला माहिती आहे का, की कॅलिफोर्नियामधील डार्थ ही गॅटरची अतिशय आक्रमक प्रजाती आहे. पाळीव प्राणी म्हणून ठेवणे बेकायदेशीर आहे. हा व्हिडिओ खूप लाइक केला जात आहे तसेच लोकांना आश्चर्याचा धक्काही देत आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला ७५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.