1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (20:11 IST)

नागपूर येथे डॉक्टरने विकले नवजात बाळ!

A doctor sold a newborn baby in Nagpur!
नागपूर : डॉ. विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे असून उपराजधानीतील नवजात बाळाची विक्री करणारे रॅकेट गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणले. या रॅकेटमध्ये नामांकित डॉक्टरचा समावेश आहो. त्यांच्यासह दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. या रॅकेटने तेलंगणा राज्यातील प्राध्यापक दाम्पत्याला 7 लाख रुपयांमध्ये नवजात बाळाची विक्री केली. 
 
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरीमध्ये ‘क्युअर इट’नावाने मोठे रुग्णालय आहे. त्याच्या या गोरखधंद्यात काही परिचारिका, महिला डॉक्टर, पॅथोलॉजिस्ट, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, महिला व पुरुष दलालांची मोठी साखळी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी विक्री करण्यात आलेल्या नवजात बाळाला ताब्यात घेतले आहे. संबंधित प्राध्यापक दाम्पत्याचीही चौकशी सुरू आहे.
 
अनैतिक संबंधातून महिलेने दिला बाळाला जन्म
कामठी तालुक्यातील गुमथळा येथे डॉ. विलास भोयर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. राहुल निमजे हा त्यांच्याकडे दलाल म्हणून काम करतो. हे दोघेही अनाथ बाळांची खरेदी-विक्री करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हैदराबाद येथील एका दाम्पत्याला मुलंबाळ नव्हते. ते सरोगसीच्या माध्यमातून बाळ घेण्याच्या प्रयत्नात होते. डॉ. भोयर यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पतीचे शुक्राणू मिळविले. दरम्यान, भोयरच्या डॉ. भोयरच्या संपर्कात एक महिला आली. अनैतिक संबंधातून तिला बाळ होणार होते. त्यामुळं ती गर्भपात करण्याच्या तयारीत होती. भोयरने तिला पैशाचे आमिष दाखवून गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. प्रसुतीनंतर पैसे देण्याचे आमिष गरीब महिलेला दाखविले.