वर्धा जिल्ह्यात हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, प्रवासी बसच्या धडकेत ३ विद्यार्थिनींचा मृत्यू
स्वातंत्र्यदिनी हिंगणघाटमध्ये एका भीषण रस्ते अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. दुचाकीचा तोल गेल्याने तिघांनाही प्रवासी बसची धडक बसली.
मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये स्वातंत्र्यदिनी शहरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघाताने आनंदाचे रूपांतर शोकात केले. शनिवारी सकाळी बसस्थानकावरून आंबेडकर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या या भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर अचानक एक कुत्रा आल्याने दुचाकीचा तोल गेला आणि तिन्ही विद्यार्थी रस्त्यावर पडले. त्याचवेळी, समोरून येणाऱ्या प्रवासी बसच्या मागच्या चाकाने त्यांना धडक दिली, ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्बा जावेद शेख १७, आरोही अनुप चोरे १६ आणि समृद्धी रूपक थामसे १५ या तीन मैत्रिणी शाळेकडे जात होत्या. साखरकर कॉम्प्लेक्सजवळ एक कुत्रा अचानक आल्याने गाडीचा तोल गेला आणि तिन्ही मुली रस्त्यावर पडल्या. नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासीबसने त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. व यामध्ये तिघींचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
प्रवासी बसविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला. शहरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या प्रवासी बसेसमुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे.
Edited By- Dhanashri Naik

