शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (16:11 IST)

कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसह तीन मुली बुडाल्या

drowning
सांगलीच्या जत तालुक्यात बिळूर येथे तलावाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसह तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुनीता तुकाराम माळी(27), अमृता तुकाराम माळी (13), अंकिता तुकाराम माळी (10)आणि ऐश्वर्या तुकाराम माली (7) असे या मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ वास्तव्यास असून घराच्या जवळच त्यांची शेती असून जवळच लिंगनूर तलाव आहे. तुकारामची पत्नी सुनीता या आपल्या तिन्ही मुलींना घेऊन गावाजवळच्या तलाव परिसरात कपडे धुण्यासाठी गेल्या.रविवारपासून त्या बेपत्ता असल्याचे समजले. सर्वत्र शोधाशोध करून देखील त्या चौघी सापडल्या नाही. नंतर तुकाराम यांनी आपल्या सासरी कोहळी येथे त्यांचा बद्दल विचारपूस केली. नंतर त्यांचा शोध लागला नाही म्हणून जत पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 
 
सोमवारी रात्री उशिरा ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध घेत असताना त्यांचे मृतदेह तलावात तरंगताना पाहिल्यावर ही घटना उघडकीस झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले .रात्री उशिरा त्या चौघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनास पाठविले. प्रकरणाचा पुढील तापास पोलीस करत आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.  
 
Edited By - Priya Dixit