रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या मेडिकल चालकासह तिघांना बेड्या; 21 इंजेक्शन जप्त

Remedesivir
Last Modified मंगळवार, 11 मे 2021 (13:33 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका मेडिकल दुकानदाराचाही समावेश आहे. मेडिकल दुकानदार अन्य दोघांना रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किमतीने विकण्यासाठी देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई करण्यात आली आहे.
शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय 34, रा. जयमल्हार नगर, दत्तकॉलनी, थेरगाव), कृष्णा रामराव पाटील (वय 22, रा. 16 नंबर बस स्टॉप, थेरगाव), निखील केशव नेहरकर (वय 19, रा. बिजलीनगर चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी शशिकांत याचे चिंचवड येथे आयुश्री मेडीकल आहे. आरोपी कृष्णा एका रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे. तर आरोपी निखिल हा डिलिव्हरी बॉय आहे.
शशिकांत याच्या सांगण्यावरून कृष्णा आणि निखिल हे दोघेजण गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत होते. दोन इंजेक्शनची डिलिव्हरी घेऊन रविवारी पहाटे पावणेतीन वाजता हे दोघेजण दोन दुचाकीवरून जात होते. काळेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या

नाकाबंदीमध्ये दोघेजण अडकले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्री परवाना बाबत त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात ते मेडिकल चालक शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे इंजेक्शन विकून पांचाळ याला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची (एम एच 14 / डी ए 4881) झडती घेतली असता सीटच्या खाली 19 रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एकूण 21 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केली.

आरोपींकडून शासनासह कोरोना रुग्णांची फसवणूक
पोलिसांनी जप्त केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची अलॉटमेंट गोदावरी मेडीकल स्टोअर्स (इनहाऊस क्रिस्टल हॉस्पिटल ) व आयुश्री मेडीकल स्टोअर्स (संलग्न ओनेक्स हॉस्पिटल) या हॉस्पिटलच्या नावाने झाली आहे. या दोन्ही हॉस्पिटलच्या नावाने वितरित करण्यात आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन हे आयुश्री मेडीकल स्टोअर्सचे केमिस्ट शशिकांत पांचाळ यांच्या ताब्यात मिळाले आहेत. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि बिलाशिवाय इंजेक्शनची विक्री केली. या प्रकरणात आरोपींनी रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने वाटप केलेल्या हॉस्पिटलमध्ये न देता शासनाची तसेच पर्यायाने त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रुग्णांची फसवणूक केली आहे.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

चमत्कार : मृत्यूनंतर तासात जिवंत झाली महिला

चमत्कार : मृत्यूनंतर तासात जिवंत झाली महिला
एखाद्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणं हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. अमेरिकेत सध्या ...

लस लावताना तुटली सुई, तरुणाचा उजवा हात आणि एक पाय काम करत ...

लस लावताना तुटली सुई, तरुणाचा उजवा हात आणि एक पाय काम करत नाही
उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा दिसून आला. येथे एका ...

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात ...

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात – चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ...

भाजप प्रवेशाचे ‘ऑफर लेटर’ घेऊन आम्ही फिरत नाही; फडणवीसांचा ...

भाजप प्रवेशाचे ‘ऑफर लेटर’ घेऊन आम्ही फिरत नाही; फडणवीसांचा पलटवार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती,असा खळबळजनक ...

पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर महिलेचा फाडला गाऊन; ...

पुण्यात लग्नास नकार दिल्याने सर्वांसमोर महिलेचा फाडला गाऊन; मग -
लग्नास नकार दिल्याने अश्लिल शिवीगाळ करणार्‍याला महिलेने जाब विचारला. तेव्हा त्याने ...