1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (15:31 IST)

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Three killed in road mishap भीषण अपघातात तिघांचा मृत्यू Marathi Regional News  In Webdunia Marathi
मुंबई- गोवा महामार्गावर बसला कारची समोरून धडक बसून तिघांचा मृयू झाल्याची घटना दासगाव खिंडीत मध्यरात्री घडली. आराम बसला कार ने समोरून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला आणि तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला.संदीप पाटील असे या मयत प्रवाशाचे नाव आहे तर अजून दोघांचे नाव कळले नाही. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास वेगाने येत असलेली ही कार महाड दासगाव खिंडीजवळ येऊन समोरून येणाऱ्या आराम बस ला जाऊन धडकली. चालक दीपक पाटील ही कार भरधाव वेगाने चालवत कल्याणकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात वेगाने कार चालवत असल्यामुळे झाला. कारचालकाच्या विरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात जखमींना महाड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.